भारत बंद, भाजप समर्थकांच्या ग्रुपमध्ये काय आहे चर्चा?

भारत बंदबद्दल 'भाजप समर्थकां'च्या सोशल मीडिया ग्रुपवर सुरू आहे अशी चर्चा….;

Update: 2020-12-07 14:35 GMT

मुंबई: मोदी सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यावरून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन तापले असून उद्या देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे या बंदची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपच्या समर्थकांच्या सोशल मीडिया ग्रुप वर सुद्धा या बंद बाबत विविध पोस्ट केल्या जात असून, बंदला विरोध केला जात आहे.

फेसबुक वरील काही ग्रुप आम्ही तपासले असता त्यात पुढील प्रमाणे काही पोस्ट आढळून आल्या आहेत. 'भाजप महाराष्ट्र' या फेसबुक ग्रुप वर मितेश देसाई यांनी लिहिले आहे की," माझ्या परिसरात जो दुकानदार आठ तारखेला दुकान बंद ठेवेल त्या दुकानातून आम्ही आयुष्यभर कधीच खरेदी करणार नाही".


तर याच ग्रुप वर मनोज कुमार लिहितातकी, "शेतकरी आंदोलनासाठी जे खेळाडू आपले अवार्ड परत करत आहेत, ते आम आदमी पार्टी आणि काँग्रेस कडून तिकीट घेणारे निघाले"



पुढे श्रीनिवास कर्ड्स यांनी ब्रिजेश सिंग यांची पोस्ट याच 'भाजप महाराष्ट्र' ग्रुपमध्ये शेअर करताना लिहिल आहे की, "आठ डिसेंबर रोजी घंटा भारत बंद होईल, मी मोदींसोबत आहोत"



त्यानंतर बीजेपी इंडिया अँड महाराष्ट्र या ग्रुपवर अर्जुन देशमुख यांनी केलेल्या पोस्टमध्ये लिहिल आहे की,आठ तारखेला शेतकरी बंद करत नाही तर काही xxx आणि xxx बंद करत आहेत. सावधान



पुढे या ग्रुप वर विक्रम सहाने यांनी पोस्ट करत लिहिले आहे की,लाखो शेतकरी आत्महत्या करत असताना कोणी भारत बंद नाही केला, पण दलालांच्या पोटावर पाय दिला की भारत बंद वारे व्वा रे व्वा...



शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी उद्या होणाऱ्या भारत बंदला देशभरातून पाठिंबा मिळतोय. अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र असं असताना भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक या बंदला विरोध दर्शवत असून सोशल मीडियावर याविरोधात विविध पोस्ट करत असताना पाहायला मिळत आहेत.

Tags:    

Similar News