आता पहाटे नाही दिवसा पाहायल मिळेल: फडणवीस
राज्याच्या राजकारणात भुकंप निर्माण करणाऱ्या वर्षभरापूर्वीच्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपविधीच्या वर्षपूर्तीला आता आता पहाटे नाही योग्यवेळी शपथविधी होईल, असं विधान केलं आहे.;
औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी हे सूचक विधान केलं आहे. ठाकरे सरकार हे बेईमानी करून आलेलं सरकार आहे. हे सरकार किती काळ टिकेल हे माहीत नाही. यावर आता बोलणं योग्य नाही. मात्र, या पुढे पहाटे शपथ घेणार नाही. योग्य वेळी शपथ घेतली जाईल, असं सूचक विधान करतानाच अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असं ते म्हणाले. तसेच ज्या दिवशी सरकार पडेल त्या दिवशी राज्यात दुसरं सरकार देऊ, असं विधानही त्यांनी केलं आहे.