शुभेंदू अधिकारी यांच्यासह त्यांच्या भावावर गुन्हा दाखल, पश्चिम बंगालचं राजकीय वातावरण पुन्हा तापलं...

Update: 2021-06-06 08:31 GMT

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या ( west bengal election results) एक महिन्यानंतर देखील तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप (TMC vs BJP) असा वाद काही थांबत नसल्याचं चित्र आहे. शनिवारी पोलिसांनी भाजपचे नवनिर्वाचित आमदार शुभेंदू अधिकारी (shubhendu adhikari) आणि त्यांचे भाऊ सौमेंदु अधिकारी (soumendu adhikari) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (FIR against Suvendu BJP leader Suvendu Adhikari and his brother Soumendu) कांठी येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात नगरपालिकेतील साहित्य चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ( Kanthi Municipal)

ही तक्रार कांठी नगरपालिके प्रशासन बोर्डाचे सदस्य (Kanthi Municipal Administrative Board) रत्नदीप मन्ना यांनी दाखल केली आहे. सौमेंदु अधिकारी कांठी नगरपालिकेचे अध्यक्ष होते. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून या दोनही नेत्यांवर गुन्हा दाखल केल्यानं पश्चिम बंगालचं राजकारण तापलं आहे.

विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा शुभेंदू अधिकारी यांनी पराभव केला होता. तेव्हा पासून दोनही पक्षांमध्ये हा तनाव कायम आहे.

दरम्यान यास चक्रीवादळात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee) यांच्यावर टीका केली होती.

"पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांनी ज्या पद्धतीने पंतप्रधानांचा अपमान केला आहे त्यावर टीका करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत"

हा वाद अद्यापपर्यंत शांत झालेला नसताना ममता बॅनर्जी यांनी कोव्हीड-१९ प्रतिबंधात्मक लसींच्या प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो हटवला आहे. प्रमाणपत्रावर आता मोदींऐवजी ममता बॅनर्जीचा फोटो छापला जात आहे.

त्यामुळं एकंदरीत पाहिलं तर इतर राज्यात निवडणुकानंतर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमधील शांत होत असतात. मात्र, पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसमधील वाद शात होताना दिसत नाहीत.

Tags:    

Similar News