धक्कादायक: पश्चिम बंगाल निवडणुकीत हिंसाचार, कार्यकर्त्यांनी केला बॉंम्बचा वापर

पश्चिम बंगाल निवडणुकीत हिंसाचार, हिंसाचारात कार्यकर्त्यांनी केला बॉंम्बचा वापर, ३ लोकांचा मृत्यू;

Update: 2021-04-10 07:54 GMT

आज (शनिवार) पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील ४४ जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदार संघासाठी एकूण आठ टप्प्यात मतदान होत आहे. आतापर्यंत तीन टप्प्यांतील मतदान पार पडलं आहे. या निवडणूकीत हिंसाचार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

कूचबिहार मधील सितालकुची विधानसभा मतदान केंद्रावर साधारण ११ वाजता भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारात बॉंम्ब आणि बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी CRPF च्या जवानांनी केलेल्या फायरिंगमध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तृणमूल कॉंग्रेसने ५ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. या संदर्भात NDTV ने वृत्त दिलं आहे.



दरम्यान आज चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी १५,९४० मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांच्यात जंगी सामना पाहायला मिळतोय.


चौथ्या टप्प्यात महिला मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण या टप्प्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण मतदारांची संख्या १,१५,८१,०२२ आहे. त्यापैकी महिला मतदारांची संख्या १५,७०,३९२ तर पुरुष मतदारांची संख्या १५,६६,१६१ आहे. त्यामुळे महिलांची भूमिका महत्वाची असणारेय.


चौथ्या टप्प्यातील मतदान कोणकोणत्या मतदारसंघात..?


पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात ४४ जागांवर मतदान होत आहे. यामध्ये मॅक्लिगंज, माथाभांगा, कूच बिहार (उत्तर), कूच बिहार (दक्षिण), सीतलकुची, सीताई अप्रिल, दिनहाटा अप्रिल, नटबरी, तूफानगंज, कुमारग्राम, कालचिनी, अलीपुरद्वार, फलकटा, मदारीहाट, सोनारपूर दक्षिण, भांगर, कस्बा, जाधवपूर, सोनारपूर उत्तर टॉलीगंज, बेहाला पुरबा, बेहला पश्चिम, महेशताला, बज बज, मटियाबुर्ज, १६९ बॅली, हावडा उत्तर, हावडा मध्य, शिबपूर, हावडा दक्षिण, संकरील, पंचला, उलूबेरिया पुरबा, दोम्जुर, उत्तरपारा अप्रिल, श्रीरामपूर, चांपदानी, सिंगूर, चंदननगर, चुंचुरा, बालागढ, पंडुआ, सप्तग्राम आणि चंदीताला या मतदारसंघांचा समावेश आहे.


पश्चिम बंगाल निवडणुकांचे वेळापत्रक


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021-294 मतदारसंघ


- पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान होणार.


- पहिला टप्पा : २७ मार्च रोजी मतदान पार पडले


- दुसऱ्या टप्पा : १ एप्रिल रोजी मतदान पार


- तिसरा टप्पा : ६ एप्रिल रोजी मतदान पार


- चौथा टप्पा : १० एप्रिल रोजी मतदान सुरू आहे.


- पाचवा टप्पा : १७ एप्रिल रोजी मतदान


- सहावा टप्पा : २२ एप्रिल रोजी मतदान


- सातवा टप्पा : २७ एप्रिल रोजी मतदान


- आठवा टप्पा : शेवटचा टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी पार पडेल.


Tags:    

Similar News