जिल्हाधिकाऱ्यांचे कोणताही आदेश नसताना समाजकल्याण वस्तीगृहामधील विद्यार्थ्यांना बळजबरीने घरी जाण्यास सांगितले जात आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले विद्यार्थी एसटी बंद असताना एकाच दिवसात वसतिगृह कसे खाली करणार, विद्यार्थ्यांचे प्रॅक्टीकल, परीक्षा उद्यावर येऊन ठेपलेल्या असताना आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांनी जिथे रेंजच नसते तिथे परीक्षा कशा द्यायच्या, अशा सर्व प्रश्नांना घेऊन विद्यार्थी जिल्ह्याधिकारी कार्यालयात गेले असता. वस्तीगृह बंद करण्याचा मी कुठलाही आदेश दिलेला नाही असे जिल्हाधिकाऱ्या कडून समजले. परंतु समाजकल्याण विभाग विनाकारण विद्यार्थ्यांना हॉस्टेल सोडण्यास भाग पाडत आहे. विद्यार्थ्यांचे जेवण, नाश्ता बंद केला आहे, प्रतिनिधी अक्षय ओव्हळ यांचा रिपोर्ट...