आम्ही मविआच्या मदतीला निघालोय आणि ते मलाच गाडायला निघाले आहेत - प्रकाश आंबेडकर
Nagpur : आम्ही इंडिया आघाडीत सामील व्हायला तयार आहोत मात्र, आम्हाला प्रतिसाद मिळत नाही. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करायची आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. नागपूरमधून जे प्रतिक्रांतीचे भूत उभ राहत आहे त्याला गाडण्यासाठी आम्ही निघालो आहोत. काँग्रेसवाले, राहुल गांधी असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार असतील त्यांच्या मदतीला आम्ही निघालो आहोत. पण दुर्दैवाने ते नागपुरच्या भुताला गाडण्याऐवजी ते मलाच गाडायला निघाले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद आयोजित कार्यक्रमात बोचरी टीका इंडिया आघाडीवर केली आहे.
दरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणाले की "इंडिया आघाडी सोबत आली तर त्यांचं स्वागतचं आहे. पण जर नाही आली तरी आपल्याला लढावचं लागणार आहे. लढायचं असेल तर आजपासून ठरवलं पाहिजे की, फालतू चर्चा बंद करून मी ज्या मतदार संघात आहे तो मतदारसंघ आम्ही जिंकल्या शिवाय राहणार नाही असा निर्धार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यावरही त्यांनी यावेळी हल्लाबोल केला ते म्हणाले की, मोहन भागवत माझा तुम्हाला सवाल आहे की, मिलिटरीच्या ८० गाड्यांचा ताफा होता, मिलीट्रीच्या गाड्या १० च्यावर जात नाही आणि जेव्हा याच्यावरती त्या जातात बॉम्बस्फोट झाला तरी जवान वाचावेत म्हणून त्यांना डबल पॅक केलं जात. मग जी ट्रान्सपोर्टची गाडी उडवण्यात आली तिला डबल पॅक केलं होतं का? याचा खुलासा करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी मोहन भागवत आणि आरएसएस यांना केले दिले आहे.
नरेंद्र मोदींच्या ५६ इंच छातीत गाठया आणि ढोकळेच आहेत बाकी काही नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. उद्याची लोकसभा ही फुले - शाहू - आंबेडकरवादी विचारांनी चालली पाहिजे. हे लक्षात घ्या. त्यासाठी जे करायचं आहे ते करण्यासाठीं सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले आहे. सुरक्षा ही व्यक्तिगत नसते तर व्यवस्थेत असते. व्यवस्था टिकली तर आपण टिकतो. म्हणून ही व्यवस्था सुरक्षित करण्याची जबाबदारी आपली आहे. असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत.