नवाब मलिक यांच्याविरोधातील केस मागे घेतली का? मोहित कुंबोज यांचे स्पष्टीकरण
नवाब मलिक विरुद्ध मोहित कुंबोज यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र नवाब मलिक यांना आता जामीन मिळाला असतानाच मोहित कुंबोज यांनी नवाब मलिक यांच्याविरोधातील केस मागे घेतल्याची चर्चा रंगली होती. त्यावर मोहित कुंबोज यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणात मोहित कुंबोज यांच्या भुमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर मोहित कुंबोज चर्चेत आले. तर पुढे मोहित कुंबोज विरुद्ध नवाब मलिक संघर्ष रंगला होता. त्यातूनच मोहित कुंबोज यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात कोरोना काळात मानहानीची आणि कोरोना नियमाच्या उल्लंघनाची तक्रार दाखल केली होती. त्यातून मोहित कुंबोज यांनी नवाब मलिक यांच्याविरोधातील केस मागे घेतल्याची चर्चा रंगली होती. त्यावर मोहित कुंबोज यांनी स्पष्टीकरण दिले.
मोहित कुंबोज म्हणाले, टाईम्स ऑफ इंडियाने चुकीची बातमी दिली आहे. मी नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीची आणि कोरोना नियमांच्या उल्लंघनाची केस दाखल केली होती. मात्र 2022 मध्ये महाराष्ट्र सरकारने कोरोना काळातील केस मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मी कोरोना नियमांच्या उल्लंघनाची केस मागे घेण्यासाठी अर्ज केला होता. मात्र मी नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेली मानहानीची केस मागे घेणार नाही. माझी नवाब मलिक यांच्याविरोधातील लढाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन मोहित कुंबोज याने केले आहे.