राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणेसह पहाटे पासून विदर्भात आणि मराठवाड्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज ऑरेंज अलर्ट दिला आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यांनाऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, गोवा, मुंबई, पुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील ४८ तासात पाऊस तीव्र किंवा अतितीव्र पद्धतीने सक्रिय होणार आहे. ९ आणि १० तारखेनंतर पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील पुढील ४८ तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात आज वातावर ढगाळ राहणार असून अधून मधून पावसाच्या तीव्र सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ९ आणि १० तारखेला पावसाचा जोर कमी होणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.