कोरोनाच संकट असलं तरी वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर करून 100 जणांनाच पायी वारीची सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी मानाच्या 10 पालख्या संस्थानांनी सरकार कडे केली आहे. गेल्या वर्षीही कोरोनाचं संकट असल्याने बस ने पंढरपूर मानाच्या 10 पालख्या गेल्या होत्या. आता मानाच्या पालख्यांसह 150 नोंदणीकृत पालख्यांना पायी वारीची परवानगी द्यावी. सर्व जण कोरोनाचे नियम पाळून पायी वारी करतील असं संत मुक्ताई पालखी संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भय्या पाटील यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं.
पंढरपूर सर्वात आधी निघणारी लांब पल्ला असणारी संत मुक्ताई दिंडी 14 तारखेला निघणार आहे. त्याआधी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.