पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित केला. यानंतर कृषीमंत्री दादा भुसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जोरदार खडाजंगी झाली. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईच्या प्रमाणापेक्षा महाविकास आघाडी सरकारच्या काळात जास्त नुकसान भरपाई दिल्याचा दावा दादा भुसे यांनी केला.
यावर फडणवीस यांनी आक्षेप घेत, मंत्र्यांना चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप केला. पण केंद्र सरकारने पीक विम्याच्या पहिल्या हप्त्याचे पैसे अजून दिले नसल्याने राज्य सरकारने दुसरा हफ्ता दिला नसल्याचे स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिले. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि दादा भुसे यांच्यात काही काळ शाब्दिक खडाजंगी देखील झाली.