राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे , तर पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी सकाळपासून मतदानासाठी संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.आरक्षणाच्या मुद्द्यांवरून चांगलंच राजकारण तापले होते. मतदान घेण्याला अनेक पक्षांनी विरोध केला होता, मात्र न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवली त्यानुसार आज हे मतदान होत आहे. मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. .
कोणत्या जिल्हा परिषदेच्या किती जागांसाठी मतदान?
धुळे – 15
नंदूरबार – 11
अकोला – 14
वाशिम -14
नागपूर -16
जागांसाठी मतदान होत आहे.
किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?
धुळे -30
नंदूरबार -14
अकोला -28
वाशिम -27
नागपूर -31
जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहे. मात्र मतदानाच्या प्रारंभ मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.