Chembur : मुंबईमधील चेंबूर येथील शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी (ASA)आंबेडकर विद्यार्थी संघटना, मुंबई च्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ते व इतर मिळणाऱ्या शासकीय लाभात काळानुरूप सुधारणा व्हावी यासह इतर १५ ते १६ मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आलं होतं. सध्या ही धोरणात्मक मागणी पूर्णतेच्या टप्प्यावर आहे. यासाठी पुढाकाराने सहकार्य करणारे केंद्रीय सामाजिक न्याय, राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतीगृह या वसतीगृहास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय लाभात कशाचीही कमी असता कामा नये, ज्यामध्ये त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, झोपण्यासाठी कॉट असेल, निर्वाह भत्ता आणि स्टेशनरी असेल, त्याच बरोबर फॅनची व्यवस्था, तसेच शासनातर्फे मिळणाऱ्या इतर सुविधा या वेळेवर मिळाल्या पाहीजे. इथून पुढील विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कृती कार्यक्रमात रिपब्लिकन पक्ष सर्व ताकदीने पाठीशी असेल, असंही रामदास आठवले यावेळी म्हणाले.