शेतकऱ्यांसाठी दिशाहीन अर्थसंकल्प - स्वाभिमानीची प्रतिक्रीया

Update: 2022-03-13 10:41 GMT

राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर झाला,मोठमोठ्या घोषणा अन् जुन्याच योजना रंगरंगोटी करून जनतेसमोर मांडण्यात आल्या आहेत,नवं काहीही यातुन मिळालेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिशाहीन असाच अर्थसंकल्प म्हणावा लागेल अशी टिका स्वाभिमानी"चे युवा आघाडीचे प्रवक्ते रणजीत बागल यांनी केली आहे.

सध्या महाराष्ट्रातील शेतकरी वीजवसुली,पिकांचे गडगडलेले भाव,खतदरवाढ यांमुळे अडचणीत असताना या अर्थसंकल्पातून दिलासा मिळणे अपेक्षित होते त्याबाबतीत कोणतही ठोस पाऊल या सरकारकडुन उचलण्यात आलं नाही हे दुर्दैवाने नमुद करावे लागेल.

स्वाभिमानी"चे प्रमुख राजु शेट्टी यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या अन्यथा बारामतीला अर्थमंत्री अजितजी पवार यांचे घरावर धडक मोर्चा काढू असा इशारा दिला होता,स्वाभिमानीच्या आक्रमक भूमिकेपुढे सरकारला देखील झुकावे लागले,नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे,हे स्वाभिमानीच्या लढ्याचे यश आहे,प्रोत्साहनपर पन्नास हजार रूपयांची घोषणा केल्याबद्दल आम्ही अर्थमंत्र्यांचे देखील अभिनंदन करतो,परंतु तातडीने याची अंमलबजावणी केली जावी,जोवर याची अंमलबजावणी होवुन नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोवर सरकार दरबारी आम्ही पाठपुरावा करू परंतु सरकारने देखील तातडीने हा दिलासादायक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा बागल यांनी व्यक्त केली.

वेळेत कर्जफेड करणार्‍या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पन्नास हजार रूपयांचे अनुदान वगळता या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीही मिळाले नाही, महावितरणची वसुली,एसटी विलिनीकरण,ऊसदराचे तुकडीकरण यावर कोणतेही निर्णय झाले नाहीत यामुळे महाविकास आघाडीने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला आहे अशीही टिका यावेळी बागल यांनी केली...

Full View

Tags:    

Similar News