हनुमान चालिसा पठनावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे एकाकी,हिंदु संघटनांची माघार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवले गेले नाहीत तर ४ तारखेपासून लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा पठन करा असं देशभरातील हिंदु बांधवांना आवाहन केले.मात्र त्यांच्या आवाहनानंतर विश्व हिंदू परिषदेने प्रतिक्रिया दिली आहे.मनसेच्या हनुमान चालिसा पठण कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद सहभागी होणार नाही.असं राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी म्हटलं आहे.
विनोद बन्सल म्हणाले, राज ठाकरे दुष्प्रचारांचं राजकारण करत आहेत.विश्व हिंदू परिषद ही राजकीय संघटना नाही.कुठल्याही पक्षाशी त्यांचा संबंध नाही.त्यामुळे हनुमान चालिसा कार्यक्रमाच्या भूमिकेशी विंहिंप सहमत नाही.विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाने मनसेच्या हनुमान चालिसा कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेचं सर्व हिंदु संघटना स्वागत करतील असं मानलं जात होते.राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे याबाबत मुद्दा उपस्थित केला.राज ठाकरेंच्या या भाषणावरुन मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी पसरली. अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.मात्र मनसे प्रमुख त्यांच्या विधानावर ठाम होते.ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा अल्टीमेटम दिला होता.त्यानंतर औरंगाबादच्या सभेतही राज ठाकरेंनी पुन्हा इशारा देत सरकारला भोंगे हटवण्यास सागिंतले आहे.