BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ; विराटपर्व संपणार ?

गेल्या काही दिवसात विराट कोहली आणि BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे. विराटने T-20 क्रिकेट संघाचे सोडलेले कर्णधारपद, त्यानंतर त्याची वन-डे क्रिकेटच्या कर्णधारपदावरून केलेली हकालपट्टी आणि विराटने पत्रकार परिषद घेऊन केलेले खुलासे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे;

Update: 2021-12-20 04:09 GMT

मुंबई : गेल्या काही दिवसात विराट कोहली आणि BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे. विराटने T-20 क्रिकेट संघाचे सोडलेले कर्णधारपद, त्यानंतर त्याची वन-डे क्रिकेटच्या कर्णधारपदावरून केलेली हकालपट्टी आणि विराटने पत्रकार परिषद घेऊन केलेले खुलासे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. याबद्दल बरेच काही लिहीले गेले, पण तरीही अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेले नाहीत. त्यातच आता एका मीडिया रिपोर्टमध्ये विराटची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्याचा विचार चार महिन्यांपासून BCCI च्या मनात होता, असा दावा करण्यात आला आहे.

विराट कोहलीने T-20 च्या कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याने वन-डे आणि कसोटी संघाचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर दिली. तर गांगुली विराटबद्दल बोलताना म्हणाला, विराटने टी-20 कर्णधारपद न सोडण्याची बीबीसीआयची विनंती नाकारली होती. मात्र विराटने पत्रकार परिषद घेत गांगुलीच्या आरोप फेटाळून लावले. तर 8 डिसेंबर पर्यंत बीसीसीआयचे माझ्याशी कोणतेही बोलणे झाले नसल्याचे विराटने सांगितले. पुढे बोलताना कोहली म्हणाला, 8 डिसेंबर रोजी कसोटी मालिकेसाठी बैठकीच्या आधी दिड तास माझ्याशी संपर्क करण्यात आला, त्यामुळे गांगुली खरा की कोहली असा प्रश्न निर्माण झाला होता.

क्रिकट्रॅकरने दिलेल्या रिपोर्टनुसार कोहलीची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्याचा विचार बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या आधीपासूनच मनात होता. त्यामुळेच बोर्डाने एकापाठोपाठ एक धक्कादायक निर्णय आहेत, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकट मालिका खेळणार आहे. तर या मालिकेसाठी रोहित शर्माला उपकर्णधार बनवण्यात आले होते. पण रोहित शर्माच्या दुखापतीमुळे के एल राहुलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पण बीसीसीआय आणि विराट कोहली यांच्यातील ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे आणि क्रिकट्रिकर्सच्या रिपोर्टमधील माहितीवरून विराट पर्व संपणार का? अशी चर्चा सुरू आहे.

Tags:    

Similar News