औरंगाबाद: शहर पोलीस दलातील एक पोलीस अधिकाऱ्याचा जंगी वाढदिवस साजरा केल्याचा व्हडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे सहायक घनश्याम सोनवणे एक दोन नव्हे तर चक्क 17 केक कापताना दिसतायेत.
सोनवणे यांच नाव आणि पुंडलिक नगर पोलीस स्टेशनच्या नावाचे अक्षर असे मिळून 17 केक तयार करण्यात आली होती. गळ्यात भलामोठा हार आणि सोबतचं पुष्पगुच्छ यांचीही रेलचेल होती. त्यामुळे हा वाढदिवस पोलिस अधिकारी यांचा होता की एखाद्या नेत्याचा असा प्रश्न पडावा एवढी मोठी धूम पाहायला मिळाली.
कोरोना नियमांचही उल्लंघन
यावेळी सोनवणे यांनी स्वतः तर मास्क घातलाच नव्हता, मात्र यावेळी त्यांना शुभेच्छा देणारे व्यक्ती सुद्धा विना मास्क असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सोबतच सोशल डिस्टन्स सुद्धा पाळले गेले नसल्याचं दिसून येत आहे.