Viral Video : पुण्यात पोलीस स्टेशनमध्ये तरुणीचा राडा

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-01-04 10:45 GMT
Viral Video : पुण्यात पोलीस स्टेशनमध्ये तरुणीचा राडा
  • whatsapp icon

पुण्यातील एका घटनेचा व्हिडिओ सध्य़ा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुणी पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलिसाला मारहाण आणि शिविगाळ करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे याची माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. पण काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा प्रकार पुण्यातील कर्वेनगर भागातील आहे. काही वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तनुसार ही तरुणी आणि तिची आई त्यांच्या परिसरातील नागरिकांच्या गाड्या दगडविटा आणि कोयत्याने फोडत होत्या, याची तक्रार तिथल्या नागरिकांनी पोलिसांकडे केली.

त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले आणि ही तरुणी आणि तिच्या आईला पोलीस स्टेशनला नेण्यात आले. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये या तरुणीने महिला पोलिसाला शिविगाळ केली तसेच मारहाण देखील केल्याचे व्हिडिओ मध्ये दिसते आहे. पण अजून या तरुणीला अटक करण्यात आलेली नाही, असेही समजते आहे. त्यामुळे पोलिसांवर या प्रकरणात कुणाचा दबाव आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


Full View

Tags:    

Similar News