अमरावतीत मोर्चाला हिसंक वळण, दुकानांची तोडफोड व दगडफेक

Update: 2021-11-12 13:52 GMT

अमरावती :  त्रीपुरा येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. अमरावतीमध्ये मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली व घटनेचा निषेध केला होता. मात्र 15 ते 20 हजार लोकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागले, यावेळी मोर्चाकऱ्यांनी जयस्थभ चौकातील व शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांत प्रचंड तोडफोड केली. तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली.

मोर्चा दरम्यान मोर्चेकऱ्यांनी भाजप विरोधात व आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलीस व आंदोलक आमने सामने देखील आले होते, तर यात या घटनेत दोन पोलीस कर्मचारी दगडफेकीत जखमी झाल्याची माहिती आहे. यामुळे काही काळ शहरात तणाव निर्माण झाला होता. तर या विरोधात भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी व भाजप नेते तुषार भारतीय यांच्यासह भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या मुस्लिम आंदोलकांवर कारवाई करून अटक करण्याची मागणी भाजपने केली.

दरम्यान त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात तनाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला जात आहे. याबाबत राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल, मात्र या घटनेचा काही घटक राजकारणासाठी वापर करत आहेत. अमरावतीच्या जनतेने अशा राजकारणाला बळी पडू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता राखावी असं आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

Tags:    

Similar News