जिल्हाधिकाऱ्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात कोरोना नियमांच उल्लंघन; व्हिडीओ आला समोर

Update: 2021-06-04 07:21 GMT

मुंबई: औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मुलीच्या साखरपुड्यात कोरोना नियम पायदळी तुडवण्यात आल्याचं समोर आलं आहे. ही घटना गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्याची असून, आता व्हिडीओ समोर आला आहे.

गेल्यावर्षी म्हणजेच 2020 ला औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण निघतच होते. त्यामुळे मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. तसेच लग्न सोहळे आणि इतर कार्यक्रम परवानगी घेऊन मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळून करता येत होते.

औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्या मुलीचा सुद्धा साखरपुड्याच्या कार्यक्रम याच काळात म्हणजे 20 ऑक्टोबर 2020 रोजी पार पडला. पण या कार्यक्रमात सोशल डिस्टन्स आणि मास्क कुणीच वापर केला नव्हता. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आणि you tube पाहायला मिळत आहे. ज्यात कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.

विशेष म्हणजे ज्या दिवशी हा कार्यक्रम पार पडला त्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यात 156 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते, तर 6 जणांचा मृत्यू झाला होता. एवढं असताना जिल्हाधिकारी यांच्या घरातील कार्यक्रमात कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात येत होते.

या व्हायरल व्हिडिओची सत्यता मॅक्स महाराष्ट्रने पडताळलेली नाही

Full View

कारवाई होणार का?

सर्वसामान्यांनी मास्क घातला नाही किंवा सोशल डिस्टन्स पाळले नाही तर त्यांच्यावर कारवाई होते. मग जिल्हाधिकारी यांच्या घरगुती कार्यक्रमात जर हेच कोरोनाचे नियन तोडण्यात आले असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. जिल्हाधिकारी यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना आम्ही संपर्क केला, मात्र त्यांनी फोन उचलला नसल्याने संपर्क होऊ शकला नाही...


Tags:    

Similar News