मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना विनायक मेटे यांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. विनायक मेटे यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देणारे वकील गुणरत्न सदावर्ते हे विनायक मेटे यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना विनायक मेटे यांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
गुणरत्न सदावर्ते हे विनायक मेटे यांच्या निवासस्थानी त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी विनायक मेटे यांच्या समर्थकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मेटे समर्थक आक्रमक झाले होते. तर त्यांनी सदावर्ते यांना उद्देशून अश्लिल शिवीगाळ करत घोषणाबाजी केली. तसेच सदावर्ते यांना मेटे समर्थकांनी कानशिलात लगावल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली.
तात्कालीन राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हे आरक्षण न्यायालयाने रद्द ठरवले. पुढे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर उच्च न्यायालयाने हे आरक्षण कायम ठेवले. मात्र गुणरत्न सदावर्ते सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्याने मराठा समाजाच्या मनात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात राग आहे.
त्यावरून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना अनेक वेळा धमक्याही दिल्या होत्या. मात्र सदावर्ते विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आले असताना विनायक मेटे यांच्या समर्थकांनी सदावर्ते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.