vinayak Mete Passes away : मराठा आरक्षणाचा आवाज हरपला

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.;

Update: 2022-08-14 02:35 GMT

विधानपरिषदेचे माजी सदस्य आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात विनायक मेटे यांच्यावर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

विधानपरिषदेचे माजी आमदार असलेल्या विनायक मेटे यांचा खोपोली येथील बोगद्याजवळ अपघात झाला होता. या अपघातानंतर विनायक मेटे यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. यामध्ये त्यांचा मुलगाही जखमी झाला असल्याचं समोर येत आहे.

विनायक मेटे यांच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रविण दरेकर हे एमजीएमच्या दिशेने रवाना झाले आहेत.



Tags:    

Similar News