सीमेवर कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी गावकऱ्यांनी प्रचंड मोठा असा तिरंगा तयार करुन अनोखी सलामी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील टोनगाव या गावातील जवान निलेश सोनवणे यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. निलेश सोनवणे हे लडाख येथे कर्तव्यावर होते. शहीद निलेश सोनवणे यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद निलेश यांच्या अंत्य दर्शसाठी पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
निलेश सोनवणे यांना आदरांजली म्हणून गावात जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच भलामोठा तिरंगा तयार करण्यात आला होता. यहा तिरंगा घेऊन रॅलीही काढण्यात आली होती. यावेळी वीर जवान अमर रहे, अशा स्वरुपाच्या घोषणाही गावकऱ्यांनी दिल्या.