विक्रम गोखले यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन. वयाच्या 77 व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास;
गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र विक्रम गोखले यांनी बुधवारी उपचारांना प्रतिसाद देणे थांबवले. तसेच विक्रम गोखले कोमात गेल्याची माहिती त्यांच्या पत्नी वृषाली यांनी दिली होती. मात्र त्यानंतर शनिवारी विक्रम गोखले यांचे निधन झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने जाहीर केले.
5 नोव्हेंबर रोजी विक्रम गोखले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेर शनिवारी विक्रम गोखले यांनी उपचारांना प्रतिसाद देणे थांबवले. त्यामुळे त्यांचे निधन झाल्याची अफवा अनेक माध्यमांनी पसरवली होती. मात्र विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर शनिवारी रुग्णालय प्रशासनाने विक्रम गोखले यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.
4 वाजता पार्थिव बालगंधर्व रंगमंदिरात ठेवणार असून साधारण 6 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
विक्रम गोखले यांनी मराठी रंगभुमी, मालिका, मराठी चित्रपट याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले होते. याबरोबरच समाजातील विविध मुद्द्यांवर विक्रम गोखले आपली ठाम भूमिका मांडत असत. त्यामुळे अनेकदा विक्रम गोखले यांच्या भूमिकांमुळे वाद निर्माण झाले. मात्र एकदा घेतलेल्या भुमिकेवरून विक्रम गोखले मागे हटत नव्हते, हे त्यांचे वैशिष्ट्य होते.