विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा; शिंदेंचे ७ खासदार ठाकरेंच्या संपर्कात

Update: 2024-04-05 09:33 GMT

लोकसभा निवडणूकीमुळे राज्यात रणधुमाळी सुरू झाली आहे, शिवसेना शिंदे गटातील तब्बल ७ खासदार हे उध्दव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शिंदेंचे निम्मे खासदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या या दाव्यामुळे महायुतीत विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.

महायुतीकडून करण्यात आलेल्या जागावाटपामुळे शिंदे गटाच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट झालाय. त्यामुळे नाराज झालेले हे खासदार पुन्हा घरवापसी करत उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातातील शिवसेनेत परतणार असल्याच्या चर्चा आहेत.

शिंदे-पवार गटात गोंधळ, भाजपची तारांबळ उडाली :

भाजपचे यावेळी सत्ता मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा संकल्प विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला असून आजघडीला शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजित पवार गट हे गोंधळलेल्या स्थितीत आहेत, तर भाजपची मोठी तारांबळ सुरू आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची इंडिया आघाडी भाजपचे पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचे स्वप्न निश्चितच धुळीस मिळवेल, असं वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, वडेट्टीवार असेही म्हणाले की, विदर्भात काँग्रेसला प्रचंड पोषक प्रतिसाद आहे. पहिल्या टप्प्यातील पाचही जागांवर जनता काँग्रेसला आपला कौल देईल. सध्याच्या सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड चिड व राग आहे.

Tags:    

Similar News