गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांचा व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूरच्या उदगाव येथील गोकुळ दूध संघाच्या चिलिंग सेंटरला दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी अचानक भेट दिली. या भेटी दरम्यानचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.;

Update: 2021-08-29 06:02 GMT

कोल्हापूर : कोल्हापूरच्या उदगाव येथील गोकुळ दूध संघाच्या चिलिंग सेंटरला दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान महाडिक यांना कामांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांनी चिलिंग सेंटरमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून शौमिका महाडिक या व्हिडीओ प्रचंड आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे.

दरम्यान महाडिक यांनी उदगाव चिलिंग सेंटरमधील कामाचा आढावा घेतला. गोकुळमधील विरोधी महाडिक गटाच्या आक्रमक संचालिका म्हणून शौमिका महाडिक यांची ओळख आहे. त्यांच्या या सरप्राईज व्हिजिटमुळे चिलिंग सेंटरच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडालेली पाहायला मिळाली. दरम्यान महाडिक यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अधिकाऱ्यांची बोलती बंद झाल्याचं पाहायला मिळालं. तातडीने कामामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिलेत.

Tags:    

Similar News