भारतीय उद्योगजगताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

दिग्गज उद्योगपती टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे ८६ व्या वर्षी निधन, मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.;

Update: 2024-10-09 19:00 GMT

मुंबई: भारतीय उद्योगजगताचे दिग्गज आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे ८६ व्या वर्षी निधन(Ratan Tata passed away )झाले आहे. रतन टाटांना आजारपणामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

रतन टाटा यांचे उद्योग क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. त्यांनी १९९१ मध्ये टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले आणि त्यानंतर अनेक यशस्वी उपक्रम सुरू केले, ज्यात टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस आणि टाटा मोटर्स यांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात टाटा समूहाला जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून दिले.

रतन टाटा नम्र वर्तनासाठी प्रसिद्ध होते, आणि ते टाटा ट्रस्टचे मानद अध्यक्ष होते. रतन टाटा यांना भारत सरकारकडून पद्म विभूषण पुरस्कार २००८ साली देण्यात आला तर पद्म भूषण पुरस्काराने २००० साली सन्मानित करून गौरविण्यात आले.

रतन टाटा यांचा जन्म २८ सप्टेंबर १९३७ रोजी झाला. त्यांचा जीवनप्रवास एक आदर्श आहे, याचे कारण असे की रतन टाटा यांनी समाजसेवेत मोठा सहभाग घेतलेला आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, रतन टाटा यांचे योगदान कधीही विसरण्यासारखे नाही.

Tags:    

Similar News