वर्षा संजय राऊत ईडी पुढे हजर होणार नाहीत..

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे दरम्यान संघर्षाचा मुद्दा ठरलेली वेळ चौकशी आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरात पोहोचली असताना आज ईडीने राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावले असताना त्यांनी पत्र पाठवून ही चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.;

Update: 2020-12-29 04:26 GMT

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवलीय. यानंतर त्यांना आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण त्या आज चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे समोर आलंय. वर्षा राऊत यांनी यासंदर्भात ईडीला पत्र लिहून माहिती दिलीय. 

आज ईडी कार्यालयात उपस्थित राहणं शक्य नसल्याचे वर्षा राऊत यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी त्यांनी ईडीकडे मागितलाय. 

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना समन्स बजावण्यात आलंय. आज २९ डिसेंबरला त्यांना चौकशीला बोलावण्यात आलं होतं. सुमारे महिन्यापूर्वीच ईडीची नोटीस वर्षा राऊत यांना पाठवण्यात आल्याची आल्याची माहिती आहे.

Tags:    

Similar News