राज्य सरकारच्या तिजोरीवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी मंत्रालयासह विविध शासकीय कार्यालयातील कामे आता बाह्ययंत्रणा म्हणजे आऊटसोर्स माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला राज्यसरकारने घेतला आहे.
या निर्णयामुळे २० ते ३० टक्के खर्चात बचत होईल असा दावा केला जात आहे.कुशल आणि अकुशल अशी दोन्ही माध्यमातील पदे बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.विकासकामांना पुरेसा निधी मिळावा तसेच प्रशासनावरील खर्चात काटकसर करण्यासाठी रिक्त जागांवर नव्याने भरती न करता ही कामे बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून करुन घेण्यात येणार आहेत.वित्त विभागाने रिक्त जागांवर नव्याने भरती न करता बाह्ययंत्रणेच्य़ा माध्यमातून करुन घेण्यात येणार आहेत.
संगणक अभियंता,डीटीपी ऑपरेटर,दुरध्वनी चालक,वाहनचालक,माळी आणि इतर अर्धकुशल कामगार,उद्वाहनचालक,शिपाई,चपराशी,चौकीदार,सफाई कर्मचारी,मदतनीस,हमाल आदी पदे बाह्ययंत्रणेकडून भरण्यात येणार आहेत.तर मंत्रालयातील लिपिक टंकलेखक, स्वीय साहायक, लघुटंकलेखक आणि सर्व कार्यालयांचे कनिष्ठ लेखापाल ही पदे मात्र सरकारी भरतीमधूनच भरण्यात येतील.
बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेताना नियमित पदे भरून ही कामे करून घेण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत २० ते ३० टक्के बचत होईल अशा रीतीने करून घ्यावीत. तसेच बाह्ययंत्रेणेद्वारे कामे करून घेताना संबंधित कंपनी किंवा संस्थेबरोबर करार करण्याची सूचनाही देण्यात आल्या आहेत.