वंचितनं कुणाचीही वाट न पाहता लोकसभेची तयारी सुरू केलीय

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका कधीही क्षणी जाहीर होतील. अशा परिस्थितीत आमच्याकडे साधनं कमी आहेत. त्यामुळं लवकर निवडणूकांच्या कामाला सुरूवात केल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.

Update: 2023-09-25 15:11 GMT

१ सप्टेंबर २०२३ रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना I.N.D.I.A. आघाडीत सहभागी होण्यासंदर्भातल्या प्रस्तावाचं पत्र वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आलं होतं. मात्र, काँग्रेसकडून त्याला अजूनही अधिकृत प्रतिसाद देण्यात आलेला नाही. ज्या नेत्यांच्या शब्दांना काँग्रेसमध्ये किंमत नाहीये, असे नेते माध्यमांद्वारे वंचितविषयी बोलत आहेत. आघाडीत सहभागी होण्याविषयी काँग्रेस अध्यक्ष खरगेंकडून अजूनही वंचितच्या प्रस्तावाला प्रतिसाद मिळालेला नाहीये, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिलीय.

लोकसभेच्या निवडणूका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळं वंचितनं त्यादृष्टीनं तयारी सुरू केलीय. शिवसेनेसोबत (उबाठा) ची आमची युती कायम आहे. मात्र, शिवसेना (उबाठा), काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचाच अजून लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये, कधी सुटेल ते माहिती नाही. शिवसेनेला (उबाठा) यासंदर्भात विचारलं असता त्यांनाही सांगत येत नाहीये. अशा परिस्थितीत शेवटी, वंचित आणि शिवसेनेते (उबाठा) लोकसभेच्या जागा वाटपाचं ठरेल, असा विश्वासही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय.

लोकसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये कुणाचीच कुणाशी युती-आघाडी झाली नाही तर पुढे काय, अशी शक्यता गृहीत धरूनच वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू केलीय. कारण वंचितकडे साधनांची कमतरता आहे, त्यामुळं लवकर निवडणूकीच्या कामाला सुरूवात केल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. वंचितच्या सर्व नेत्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचं नियोजन झालंय. त्याची सुरूवात मराठवाड्यातील लातूर पासून होणार आहे. पुढे सातारा, बीड आणि नाशिकमधील सटाणा इथं वंचितच्या सभांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिलीय.


Full View

Tags:    

Similar News