शाहू महाराजांना "वंचित बहूजन आघाडी"चा पाठिंबा ; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

Update: 2024-03-23 14:10 GMT
शाहू महाराजांना "वंचित बहूजन आघाडी"चा पाठिंबा ; प्रकाश आंबेडकरांची घोषणा
  • whatsapp icon

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापूर लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भातील तिढ्याचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही परंतु वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा असल्याचे घोषीत केले.

दरम्यान, शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आपल्या एक्स अकाउंट वरून ट्वीट करत जाहीर आभार मानले आहेत. समतेचा विचार आणि संविधान टिकवण्यासाठी आपला पाठिंबा निश्चितच आम्हाला बळ देईल, असं त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

Tags:    

Similar News