Mumbai : मुंबईत कुर्ला तालुक्यातील 145 बिल्डिंग हनुमान नगर येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाची गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मुंबई महानगरपालिकेकडून तोडफोड करण्यात आली. यामुळे परिसरातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची लाट निर्माण झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्निल जवळगेकर यांनी प्रशासनाला कार्यालय तोडू नये म्हणून विरोध केला असता प्रशासनाकडून त्यांची कसलीही दखल न घेता कार्यालय पाडण्यात आलं.
दरम्यान कार्यालयात लहान मुलांची अंगणवाडी चालवण्यात यायची ज्यावेळी महानगरपालिकेचे कर्मचारी कार्यालय पाडण्यासाठी आले होते, त्यावेळी ही लहान मुलं कार्यालयातच होती, प्रशासनाकडून कार्यालय पाडत असताना या लहान-लहान चिमुकल्यांना किरकोळ जखम झाल्याचेही सांगण्यात आलं आहे.
स्वप्निल जवळेकर असं म्हणाले की, महानगरपालिकेकडून कार्यालयाची तोडफोड करण्यापूर्वी आम्हाला किमान एखादी पूर्वसूचना तरी द्यायला हवी होती परंतु असं काहीही न होता केवळ राजकीय सूडबुद्धीने कार्यालयाची तोडफोड करण्यात आली असल्याचेही स्वप्निल जवळगेकर यांनी यावेळी सांगितले