उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यांचे निधन
समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.;
गेल्या काही दिवसांपासून उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीमध्ये चढ-उतार होत होता. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांना लाईफ सेव्हिंग ड्रग्जवर ठेवण्यात आले होते. मात्र रविवारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि सोमवारी सकाळी 8 वा. मुलायम सिंह यांचे निधन झाले.
मुलायमसिंह हे गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये 22 ऑगस्टपासून उपचार घेत होते. मात्र 2 ऑक्टोबरपासून मुलायमसिंह यादव यांची प्रकृती अधिक बिघडली. त्यामुळे त्यांना ICU मध्ये हलवण्यात आले होते. मात्र सोमवारी सकाळी 8 वा मुलायम सिंह यांचे निधन झाले.
मुलायमसिंह यादव हे भारतीय राजकारणातील कसलेले राजकारणी होते. तसेच त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. त्यांनी तीन वेळा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. तसेच मुलायमसिंह यादव यांची संसदीय कारकीर्दही चांगलीच गाजली होती. त्यांनी देशाचे संरक्षणमंत्रीपद सांभाळले होते. तसेच सध्या मुलायमसिंह यादव हे लोकसभेचे खासदार आहेत. ते मैनपुर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. यापुर्वीही मुलायमसिंह यादव हे संबल आणि आझमगड मतदारसंघाचे खासदार होते. लोक त्यांना प्रेमाने नेताजी म्हणतात.
मेरे आदरणीय पिता जी और सबके नेता जी नहीं रहे - श्री अखिलेश यादव
— Samajwadi Party (@samajwadiparty) October 10, 2022
समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून अखिलेश यादव यांनी मुलायमसिंह यादव यांच्या निधनाचे वृत्त दिले.