...जेव्हा पत्रकाराच्या 70 वर्षाच्या आई वडिलांना धमकावलं जातं

जेव्हा पत्रकाराने केलेल्या बातम्यांमुळे पत्रकाराच्या आई वडिलांना धमकावलं जातं. तेव्हा त्या आई वडिलांची काय अवस्था होत असेल? सध्याच्या घडीला खरी पत्रकारीता करणाऱ्या पत्रकाऱ्यांच्या कुटुंबाला कोणत्या परिस्थितीतून जावं लागत आहे. याचं एक उदाहरण...;

Update: 2021-06-17 16:40 GMT

पत्रकार आशिष सागर हे गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात केन नदीतील अवैध वाळू उत्खननाच्या बातमीचं कव्हरेज करत आहेत. दरम्यान जिल्ह्यातील पैलानी परिसरातील अमळोर मौरम खाणीतून नियमांचे उल्लंघन करून वाळू उपसा केल्याचा आरोप केला जात आहे. ज्यामुळे नदी तसेच पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत आहे.

यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली असून, तेथील एसडीएम चे म्हणणे आहे की, इथे कोणत्याही प्रकारचे अवैध उत्खनन होत नाही.

पत्रकार आशिष सागर केन - बेतवा नदीला जोडणाऱ्या प्रकल्पात बाधित झालेल्या आदिवासीयांची समस्येवर स्टोरी करण्यासाठी सुमारे २०० किलो मीटर अंतरावर असलेल्या एका गावातच मुक्कामी होते. दरम्यान त्यांना अनेकदा फोन आले, मात्र ते या स्टोरीमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी फोन घेतले नाही.

जेव्हा ते फ्री झाले तेव्हा त्यांनी फोन पाहिला असता, त्यांना त्यांच्या आईचे अनेक कॉल येऊन गेल्याचं त्यांना दिसलं. रात्रीचे नऊ वाजले असता त्यांनी त्यांच्या आईला फोन केला, तेव्हा त्यांना अत्यंत चिंताजनक स्वरात तिथून थरथर कापणारा आवाज ऐकू आला.

'त्यांची आई म्हणाली - तू अशी कामं का करतोस की लोक घरी धमक्या द्यायला येतात? तुला शांतपणे जगता येत नाही का? जसे इतर लोक शांततेत आपल्या घरादाराचं पोट भागवतात, तसं आपण नाही का जगू शकत, तू असं का वागतोस? '

हे ऐकल्यानंतर आशिष चिंतेत पडले, त्यांना भीती वाटू लागली. परंतु त्यांनी स्वतःला सांभाळत आपल्या आईला खात्री करून दिली की, कोणालाच काही होणार नाही, तू चिंता करू नकोस. सोबतच त्यांनी हे ही सांगितले की, मी जे काम करतो त्यात काहीच चुकीचं नाही, हे लोकहिताचं काम आहे.

दरम्यान, आशिष सागर हे गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील केन नदीत अवैध उत्खननाबद्दल बातमीचं कव्हरेज करत होते. जिल्ह्यातील पैलानी भागातील अमलोर मौरम खाणीतून नियमांचे उल्लंघन करत वाळू उपसा होत असल्याचा आरोप केला जात आहे, ज्यामुळे नदी व पर्यावरणाचे गंभीर नुकसान झाले आहे.

या खाणीचा संचालक गाझियाबादचा रहिवासी विपुल त्यागी असून त्याचा साथीदार जयराम सिंह हा बसपा चा नेता आहे.

सागरने सांगितले की, 14 जून रोजी जयराम सिंह आपल्या पाच साथीदारांसह त्यांच्या घरी गेला होता आणि आईला म्हणाला, 'तुझ्या मुलाला समजावून सांगा, माझ्याविरूद्ध अशा बातम्या लिहू नको.'

सागर व्यतिरिक्त अमलोर गावचे सरपंच प्रवीण सिंह प्रिया आणि कार्यकर्ते उषा निषाद यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. परंतु अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.

निवेदनात म्हटले आहे की, आपल्या ग्रामपंचायतीमधील अमळौरमध्ये संचालित ब्लॉक -7 वरील वर्ग 3 मधील ओव्हरलोडिंग क्लिअरन्स आणि बेकायदेशीर उत्खनन यासंदर्भात त्यांनी पत्र दिले होते, परंतू लेखापाल (auditor) यांनी त्यांच्या अनुपस्थितीत याबद्दल चौकशी केली आणि काय कारवाई केली गेली हे देखील सांगितले नाही.

मात्र, तेथे अवैध उत्खनन होत नसल्याचा दावा पैलानी एसडीएम रामकुमार यांनी केला आहे.

एसडीएमने द वायरला सांगितले कि, 'मला माहिती नाही कोणी कोणाला धमकी दिली, माझा याच्याशी काही संबंध नाही. तेथे कोणतेही अवैध खनन होत नाही. पट्टेदार त्यांच्या क्षेत्रात खाणकाम करीत आहेत. मात्र, पट्टेदार व त्यांचे सहकारी कोण आहेत. हे मला माहित नाही, तरी फाईल पाहिल्यानंतर मी याबद्दल सांगू शकेल.

तर दुसरीकडे, धमकीसंदर्भात बांदा पोलिसांनी म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पत्रकार आशिष सागर म्हणतात की, मला स्वत:च्या जीवाची भीती वाटत नाही, बेकायदा उत्खननाविरोधात लढा सुरूच राहील.

ते पुढे म्हणाले, 'माझ्यासारखे लोक स्वत:साठी कधीच घाबरत नाहीत. मला फक्त माझ्या वृद्ध आई - वडिलांची काळजी आहे. त्यांचं वय ७२ वर्षांहून अधिक आहे, जरा विचार करा जर अशा परिस्थितीत पाच-सहा लोक तुमच्या घरी जाऊन धमकी देऊ लागले. तर त्यांची काय हालत झाली असेल. त्या लोकांनी मला अनेक फोन केले पण मी घेतले नाही तर ते थेट माझ्या घरी पोहोचले.

पत्रकार सागर म्हणाले, बसपा नेत्याने माझ्या आईला सांगितले होते की, 'मुलाला समजावून ठेवा, नेतागिरी करू नये, जेव्हा काही गुन्हे दाखल होतील तेव्हा समजेल तुम्हाला.

तर दुसरीकडे बसपाचे नेते जयराम सिंह यांनी असा दावा केला आहे की, अवैध वाळू उत्खनन केल्याची तक्रार देऊन पत्रकार आणि कार्यकर्ते पैसे उकळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

ते म्हणाले, 'जे लोक त्यांना पैसे देतात, त्यांच्यासाठी हे गप्प असतात. मी स्थानिक व्यक्ती आहे आणि प्रामाणिकपणे राजकारण करतो, म्हणून मी त्यांच्यापुढे झुकणार नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून वाळूचा व्यवसाय करणारे जयराम सिंह या धमकीच्या संदर्भात म्हणाले, 'मी रस्त्यावरून जात असताना, मला त्यांची आई दिसली. मी खाली वाकून त्यांना नमस्कार केला. आम्ही त्यांना म्हटलं की, आई आम्ही तुमचे शेजारी आहोत. मात्र, तुमचा मुलगा काहीही चुकीच्या बातम्या देत आहे. तुम्ही स्वत: आमच्या सोबत येऊन बघा जरा बेकायदेशीर वाळू उपसा होत असेल तर करा अवैध खनन च्या बातम्या. पण तसं नसेल तर मग हे सर्व करु नका. हे चुकीचं आहे.

आशिष सागर हे चळवळी व्यक्तीमत्व तसेच पत्रकार असल्याने त्यांनी लग्न केलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की, ते ज्या प्रकारचं काम करतात. त्यामुळे इतर लोकांना त्यांच्याबरोबर त्रास सहन करावा लागतो, म्हणून त्यांनी लग्न केलं नाही.

सकाळी उठून घरातील सर्व कामं करून आई-वडिलांची खाण्यापिण्याची व्यवस्था करुन सागर आपली स्टोरी करायला बाहेर पडतात. गेल्या एक दशकापासून त्यांनी बुंदेलखंडचे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित मांडले आहेत. ज्यात बुंदेलखंड पॅकेज, पिण्याच्या पाण्याचे सर्व प्रकल्प, वृक्षारोपणातील अनियमितता, नद्या जोड प्रकल्प अशा अनेक कामांचा समावेश आहे.

काम करतांना त्यांनी माहितीच्या अधिकाराचा (आरटीआय) खूप वेळा वापरला केला आहे. दरम्यान माहिती न मिळाल्याबद्दल त्यांनी कायदेशीर लढाई देखील लढली तसेच बर्‍याच लोकांना त्यांनी याबद्दल जागरूकही केले आहे.

सध्या ते 'व्हॉईस ऑफ बुंदेलखंड' नावाचे स्वतःचे चॅनेल चालवत आहे. याशिवाय ते बुंदेलखंड येथील प्रेस ट्रस्टचे संस्थापक सुद्धा आहेत.

अलीकडेच एबीपी न्यूजचे पत्रकार सुलभ श्रीवास्तव यांचा प्रतापगडमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत्यूच्या एक दिवस अगोदरच त्यांनी दारू माफियांकडून जीवाला धोका असल्याचं म्हणत अलाहाबाद झोनच्या एडीजीला पत्र लिहिले होते.

इस मामले का संदर्भ देते हुए आशीष सागर ने कहा, 'मां-बाप कहते हैं, खाने दो अगर दुनिया खा रही है, क्या हो जाएगा ये सब करने से, देख लो प्रतापगढ़ के पत्रकार के साथ क्या हु, लेकिन मेरा मानना है कि जो सही है, यदि हम उस पर आवाज नहीं उठाएंगे, तो ये जुर्म है.'

याच प्रकरणाचा संदर्भ देताना आशिष सागर म्हणाले, आई - वडील म्हणतात की, खाऊ दे ज्यांना खायचं आहे, हे सगळं करून काय होईल, बघ त्या प्रतापगडच्या पत्रकाराचं काय झालं, पण मी असा विचार करतो की, चुकीच्या गोष्टींसाठी आवाज न उठवणं देखील गुन्हा आहे.

या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी त्वरीत योग्य ती कारवाई न केल्यानं पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेश कॉंग्रेसने देखील ट्वीट करून म्हटले आहे की, 'वाळू उत्खनन आणि पर्यावरणासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यामुळे अमोलोर गावचे सरपंच, पत्रकार आशिष सागर दिक्षीत आणि उषा निषाद यांना वाळू माफियांकडून सतत धमक्या येत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर त्यांना सुरक्षा द्यायला हवी.

त्याला उत्तर देत बांदा पोलिसांनी म्हटले आहे की, आवश्यक कारवाईसाठी क्षेत्र अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान माध्यमं स्वातंत्र्याशी संबंधित 'रिपोर्टर विथ बॉर्डर्स' च्या वार्षिक अहवालात प्रेस स्वातंत्र्यांच्या यादीत भारत १८० देशांमध्ये १४२ व्या क्रमांकावर आहेत.

याचा अर्थ असा आहे की, भारत देश पत्रकारितेसाठी धोकादायक ठरला आहे. आणि त्यामध्ये उत्तर प्रदेशची अवस्था अधिक दयनीय आहे. येथे पत्रकारांना त्यांचं काम केल्याबद्दल त्यांना मारहाण, धमकावणे तसेच हत्या करणे यांसारखे प्रकार समोर आले आहेत.

Tags:    

Similar News