खून आणि अपहरणाच्या घटनांमध्ये उ. प्रदेश आघाडीवर, NCRB-2020 अहवाल

Update: 2021-09-16 12:01 GMT

२०२० मध्ये देशात दररोज खुनाचे ८० गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात NCRBच्या २०२० या वर्षाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. पण या वर्षात अपहरणाच्या घटना कमी झाल्याचीही माहिती देण्यात आली आहे. २०२०मध्ये दिवसाला ८० लोकांचे खून झाल्याने एकूण बळींची संख्या २९ हजार १९३ झाली आहे. यामध्ये राज्यांच्या आकडेवारीत उत्तर प्रदेशचे नाव सगळ्यात वर आहे. २०१९मध्ये देशात २८ हजार १९५ खुनाच्या घटना घडल्या होत्या. तर दिवसाला सरासरी ७९ जणांच्य़ा हत्या झाल्या होत्या. यामध्ये २०२०मध्ये एक टक्क्यांनी वाढ झाल्याचेही यामुळे समोर आले आहे. पण अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये १९ टक्क्यांनी कपात झाली आहे.

खुनाच्या एकूण दाखल गुन्ह्यांपैकी ३ हजार ७७९ गुन्हे उत्तर प्रदेशात दाखल झाले होते. त्यानंतर बिहार (३१५०), महाराष्ट्र (२१६३), म. प्रदेश (२१०१), प.बंगाल (१९४८) या राज्यांचा क्रमांक आहे. दिल्लीमध्ये खुनाचे ४७२ गुन्हे दाखल झाले आहेत. खून झालेल्या लोकांमध्ये ३० ते ४५ वर्ष वयोगटातील लोकांचे प्रमाण ३८.५ टक्के आहे. तर १८-३० वयोगटातील मृतांचे प्रमाण ३५.०९ टक्के म्हणजेच खुन झालेल्यांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त तरुण लोकांचा समावेश आहे.

तर खुनाच्या गुन्ह्यांसह उ.प्रदेश अपहरणाच्या गुन्ह्यांमध्येही आघाडीवर राहिला आहे. २०२०मध्ये उ. प्रदेशात १२ हजार ९१३ अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश (९,३०९) महाराष्ट्र (८,१०३), बिहार (7889), म. प्रदेश (७, ३२०) असे गुन्हे दाखल झाले होते. दिल्लीमध्ये अपहरणाचे ४ हजार ६२ गुन्हे दाखल झाले होते. अपहरण झालेल्या ८८ हजार ५९० व्यक्तींपैकी ५६ हजार ५९१ लहान मुलं होती. तर महिलांवरील बलात्काराचे गुन्हे राजस्थानमध्ये सर्वाधिक प्रमाणात नोंदवले गेले. तर त्यानंतर उ. प्रदेशचा दुसरा नंबर होता.

Tags:    

Similar News