ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तिहाद-उल-मुसलिमीन पक्षाचे नेते (AIMIM) असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात जातीय सलोखा बिघडवणे, कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे आणि पंतप्रधानांच्या विरोधात असभ्य वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
त्याच्यावर कलम 163 ए (धर्म आणि वंशाच्या आधारावर द्वेष पसरवणे), कलम 188 (सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन करणे), 269 (निष्काळजीपणे संसर्ग पसरवणे), धारा 270 (मुद्दाम रोग पसरवणे) आणि आणि पॅडेंमिक अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाराबंकीचे पोलीस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
ते म्हणाले,
आपल्या भाषणात एआयएमआयएम प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी सांप्रदायीक विधान केलं असल्याचं म्हटलं आहे.
असदुद्दीनने असे सांगून एका विशिष्ट समाजाच्या भावना भडकवल्या आणि जातीय सलोखा भंग केला असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
तसेच ओवेसींनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांबद्दल 'असभ्य' वक्तव्य केल्याचेही ते म्हणाले.
खासदार असदुद्दीन ओवेसी तीन दिवस उत्तर प्रदेश दौऱ्यावर होते. त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या बैठका घेतल्या. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 मध्ये त्यांचा पक्ष 100 जागा लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.