संयुक्त राष्ट्र अफगानी जनतेच्या पाठीशी

अफगाणिस्तानातील सत्ता परिवर्तनानंतर नव्याने संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीचे अध्यक्ष पद भूषवत असलेल्या भारताने आपली भूमिका जाहीर करत अफगाणिस्तान मधील महिला आणि लहान मुलं, युवा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरल्याने सांगत अफगाणिस्तान मधील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.;

Update: 2021-08-17 03:51 GMT

भर दिवसाच्या संघर्षानंतर अफगाणिस्तानमधील काबूलवर तालिबान्यांनी ताबा मिळवला. सध्याची परिस्थिती पाहता जगातील अनेक देशांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अलीकडेच रोटेशन पद्धतीने भारताच्या वाट्याला आलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्यात आली होती.

अफगाणिस्तान मधील तालिबान्यांची दहशत खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका भारताने या युएनएससी बैठकीत मांडली आहे.संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टीएस तिरुमूर्ती म्हणाले, आतंकवादी संघटनेनं शांततेच्या मार्गाने गेले पाहिजे.

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर आतंकवादी संघनेद्वारे कोणत्याही देशाला धमक्या आणि हल्ल्यासाठी वापर नाही करणार असे स्पष्ट करावे. काबूल येथील हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमान तळावर हाहाकार उडाला असून विमानतळावरील घटनांचे पडसाद उमटत असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. विमानतळ परिसरात होत असलेल्या गोळीबारांच्या घटना देखील घडल्या आहेत.



भारताचे प्रतिनिधी तिरुमूर्ती यांनी म्हटलं आहे की, अफगाणिस्तानात संकट येण्यापुर्वीपासून ३४ शहरांत विकासकामे सुरु आहेत. यामुळे संबंधित संघटनेकडून कायदा आणि सुव्यवस्थेची अपेक्षा करत आहोत. तालिबानी संघटनेनं आपल्यापासून कोणतीही भीती नसल्याचे स्पष्ट करावे असे आवाहन भारताने केलं आहे.

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत अफगाणिस्तानचे प्रतिनिधी गुलाम एम इसाकजई यांनी तालिबान आपल्या आश्वासनांचे पालन करत असल्याचे म्हटलं आहे. अफगाणिस्तानमधील नागरिक भीतीच्या वातावरणात जगत आहेत.

अफगाणिस्तानमधील महिला, मुली आपल्या राजकीय, आर्थिक, समाजिक स्वातंत्र्य गमावणार आहेत. अफगाणिस्तानचा संपूर्ण ताबा घेतल्यानंतर तालिबानने नागरिकांच्या नोंदणी साठी प्रत्येक घराची झाडाझडती घेण्यात येत आहे अशी माहिती अफगाणिस्तानच्या प्रतिनिधीनी दिली आहे.

Tags:    

Similar News