"एक दिवा आपल्या लेकीच्या सन्मानार्थ" ; वैद्यनाथ मंदिरात उपक्रम

"एक दिवा आपल्या लेकीच्या सन्मानार्थ" हा उपक्रम राबवत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.;

Update: 2021-07-27 04:21 GMT

बीड : "एक दिवा आपल्या लेकीच्या सन्मानार्थ" हा उपक्रम राबवत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी न करता वाढदिवस साजरा करावा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं, आणि यालाच प्रतिसाद देत परळीत वैद्यनाथाच्या मंदिर परिसरात महिलांनी पणत्या लावून आपल्या पंकजा मुंडे यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोकणातील महापुरबाधितांना सावरण्यासाठी केली प्रार्थना

परळीत या उपक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. कोकणात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. आणि हीच परिस्थिती पूर्वपदावर येऊन या ठिकाणच्या नागरिकांना जगण्याची नवी उमेद मिळावी, अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आलीय. दरम्यान यावेळी परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पणत्या लावल्यानं मंदिर परिसर उजळून निघाला होता.

Tags:    

Similar News