वेतन थकल्याने महिलांचे अनोखे आंदोलन, आमदार चढले झाडावर

प्रजासत्ताक दिनाच्या (republic day) दिवशी बीड जिल्ह्यात दोन महिलांनी झाडावर चढत अनोखे आंदोलन केले. तर महिलांना झाडावरून खाली उतरवण्यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे झाडावर चढले. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते.;

Update: 2022-01-26 13:04 GMT

प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे बीड जिल्ह्यात होते. दरम्यान बीड नगरपरिषदेच्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी झाडावर चढून आंदोलन केले. त्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आंदोलनस्थळी पोहचले. तर संदीप क्षीरसागर थेट झाडावर चढत महिलांना खाली उतरण्याची विनंती केली. तेव्हा आमदार संदीप क्षीरसागर यांना झाडावर चढलेले पाहून धनंजय मुंडे चांगलेच संतापले.

बीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचे काका भारतभुषण क्षीरसागर यांनी सफाई कामगार महिलांचे वेतन रखडवले होते. त्यामुळे महिलांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने झाडावर चढून अनोखे आंदोलन सुरू केले. दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आंदोलनस्थळी पोहचले. त्यावेळी आमदार संदीप क्षीरसागर हे झाडावर चढून महिलांना खाली उतरवण्यासाठी विनंती करत होते. ते पाहून महिलांना झाडावर चढवणाऱ्या आंदोलन प्रमुखावर धनंजय मुंडे चांगलेच संतापले. मात्र आमदार संदीप क्षीरसागर यांनी आंदोलनकर्त्या महिलांना वचन देत खाली उतरवल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे ध्वजारोहणासाठी पोलिस मुख्यालय येथे पोहचले होते. त्यावेळी बोगस रस्त्याच्या कामाच्या तक्रारी करूनही न्याय न मिळाल्याने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बोगस रस्ताप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यापाठोपाठ महिलांनी झाडावर चढून आंदोलन केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

मात्र आमदार संदीप क्षीरसागर यांनी महिलांचे ऐकून घेतल्याबद्दल महिलांनी आमदार क्षीरसागर यांचे आभार मानले.

Tags:    

Similar News