केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्यमंत्रालयाकडून लोणावळा , सासवडला सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज पुरस्कार जाहीर

Update: 2021-11-17 14:28 GMT

पुणे : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-2021 मध्ये लोणावळा आणि सासवड शहरांना सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज पुरस्कार जाहीर झाला आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्त 20 नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण होणार आहे.

दरम्यान जुन्नर, शिरूर, लोणावळा, सासवड, जेजुरी, इंदापूर या शहरांनाही कचरा मुक्त शहरे म्हणून पुरस्कृत करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नगर परिषदांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

या गावांमध्ये कचरा डेपोत येणाऱ्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे पुनर्वापर करण्यात येत आहे. नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. त्याचबरोबर शासनाच्या 'हरित ब्रॅण्ड' अंतर्गत शेतकऱ्यांसाठी हे खत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सोबतच हागणदारी मुक्त गाव योजनेअंतर्गत 600 लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आली आहेत. सासवड नगरपरिषदेने शहरात 6 हजारहून अधिक वृक्षांची लागवड व जोपासना केलेली आहे. प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने सणांच्या दिवसांमध्ये पर्यावरणपूरक मुर्ती निर्माल्य संकलन कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत.

Tags:    

Similar News