पश्चिम बंगालमध्ये गावकऱ्यांचा केंद्रीय मंत्र्यावर जीवघेणा हल्ला

Update: 2021-05-06 14:30 GMT

पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर जिल्हातील पंचखुड़ी भागात गुरुवारी केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्य मंत्री आणि भाजपा नेते वी. मुरलीधरन यांनी त्यांच्यावर स्थानिक लोकांनी हल्ला केल्याचा दावा केला आहे.

मुरलीधरन यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून या व्हिडीओत एका गाडीवर लोक काठ्या आणि दगड मारत आहे. हल्ला करणाऱ्यांनी गाडीची मागची काच देखील फोडली आहे.

या संदर्भात मंत्री मुरलीधरन यांनी ट्वीट करून "टीएमसी च्या गुंडांनी पश्चिम मिदनापुर मध्ये ताफ्यावर हल्ला केला. खिडक्या तोडल्या,खाजगी सहाय्यकावर हल्ला केला. मला माझा दौरा आटपावा लागला'' असं म्हटलं आहे.

मुरलीधरन हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची पाहणी करण्यासाठी 2 मे ला पश्चिम बंगालला गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत भाजप नेते राहुल सिन्हा देखील होते. त्यावेळी हा हल्ला झाल्याचं समजतंय.

या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना मुरलीधरन म्हणाले

"ही बंगाल ची संस्कृती नाही होऊ शकत. इथं महिलांवर हल्ले होत आहे. इथं फक्त गुंडागर्दी सुरु आहे. याशिवाय काहीच नाही. मी या संदर्भात केंद्राला रिपोर्ट देईल."

असं त्यांनी म्हटलं आहे.


Tags:    

Similar News