मुस्लीम बौद्ध आदिवासी समाज भाजपपासून दुरावला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची कबुली

मुस्लीम बौद्ध आदिवासी समाज भाजपपासून दुरावला नितीन गडकरींची कबुली

Update: 2024-11-10 07:53 GMT
मुस्लीम बौद्ध आदिवासी समाज भाजपपासून दुरावला,  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची कबुली
  • whatsapp icon


लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप बहुमत प्राप्त करेल असा दावा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून केला जात होता. पण देशात भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला. महाराष्ट्रात देखील हीच स्थिती होती. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भात ११ जागांपैकी केवळ ३ जागांवर भाजपला यश मिळालं होतं. या अपयशामागे संविधान बदलाचा मुद्दा असल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी न्यूज तकवरील मुलाखतीमध्ये दिली आहे. नितीन गडकरींना मिळालेल्या मतदानाची टक्केवारी देखील लोकसभा निवडणुकीत घटली होती. याच्या कारणाचे विश्लेषण करताना ते म्हणाले की “नागपूर ही दीक्षाभूमी आहे. या परिसरात बौद्ध, मुस्लीम आणि आदिवासींची संख्या मोठी आहे. संविधान बदलाचा मुद्यामुळे या समूहाला असुरक्षित वाटल्याने मताची टक्केवारी घटली आहे”. मात्र या निवडणुकीत हा गैरसमज दूर झाल्याने हा समुदाय पुन्हा एकदा भाजपसोबत येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे..

Tags:    

Similar News