फलकावरून केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे नाव गायब; भाजप कार्यकर्ते आक्रमक
भाजपचे नगराध्यक्ष असलेल्या येवला नगर परिषदेत शहरातील विविध उद्घाटनप्रसंगी फलकावरून केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे नाव गायब झाल्याने कार्यकर्ते आक्रमक;
भाजपचे नगराध्यक्ष असलेल्या येवला नगर परिषदेत शहरातील विविध उद्घाटनप्रसंगी फलकावरून केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे नाव गायब झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ यांच्या मतदार संघात नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता असून यावेळेस नगरपालिकेच्या विविध विकास उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाव टाकण्यात आले, पण यावेळी फलकावरून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे नाव न टाकल्याने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहे.
भारती पवार या भाजपच्या असल्यानेच त्यांचे नाव फलकावरून गायब झाल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. विकास कामात देखील राष्ट्रवादीकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी येवला नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच धरणे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली विशेष म्हणजे येवला नगरपालिकेचे नगराध्यक्षपद हे भाजपकडे आहे.त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नगराध्यक्षाला घरचा आहेर दिल्याची चर्चा शहरात रंगली होती.