युक्रेनचा आंतरराष्ट्रीय न्यायालयात विजय, रशियाला दणका

रशिया युक्रेन युध्दाबाबत उच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल दिला आहे.;

Update: 2022-03-17 03:13 GMT

रशिया युक्रेन युध्दाचा 21 वा दिवस उजाडला आहे. मात्र अजूनही युध्द सुरुच आहे. तर या युध्दात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर युक्रेन रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला होता. त्याचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला असून त्यामध्ये रशियाला मोठा दणका दिला आहे.

रशिया युक्रेन युध्द सुरू असून युक्रेन रशियाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला होता. तर त्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाच्या विरोधात निकाल दिला आहे. त्यामुळे हा युक्रेनचा मोठा विजय मानला जात आहे. तसेच आता युध्द थांबणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रशिया युक्रेन युध्द पेटल्यानंतर युक्रेन रशियाच्या विरोधात नेदरलँडच्या हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला होता. त्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सुनावणी पुर्ण केली असून निकालात रशियाला युध्द थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटले आहे की, 24 फेब्रुवारीपासून रशियाने युक्रेनच्या भुमीवर सुरू केलेल्या लष्करी कारवाया स्थगित कराव्यात. तसेच यानंतर रशियाने लष्करी कारवाईचे कोणतेही पाऊल उचलू नये. याबरोबरच दोन्ही देशांनी वाद चिघळणाऱ्या कृतीपासून दुर रहावे, असे म्हटले आहे.

पुढे बोलताना न्यायालयाने म्हटले की, युक्रेनने रशियाला कडवी झुंज दिली आहे. तर यावेळी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने झेलेंस्की यांचे कौतूक केले. मात्र रशिया समर्थक देशांनी रशियाला लष्करी मदत न देण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निकाल रशियावर बंधनकारक असणार आहे. त्याबरोबरच रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचे पालन न केल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडेल. त्यामुळे रशिया आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचे पालन करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



Tags:    

Similar News