Indian Student : युक्रेनने भारतीय विद्यार्थांना ठेवले ओलिस?, परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

युक्रेनने खारकीव्ह शहरात भारतीयांना ओलीस ठेवले असल्याचा दावा रशियाने केला आहे. त्यावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.;

Update: 2022-03-03 07:33 GMT

रशिया युक्रेन युध्द सुरू आहे. तर युक्रेनमध्ये शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहे. त्यातच युक्रेनच्या खारकीव्ह शहरात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना युक्रेनने ओलिस ठेवले असल्याचा दावा रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली होती. त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

रशिया युक्रेन युध्दाची तीव्रता वाढत आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर मिसाईल हल्ले सुरु केले आहेत. त्यातच युक्रेनच्या खारकीव्हमध्ये रशियाच्या मिसाईल हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले असल्याचा धक्कादायक दावा रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला होता. त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिले आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट करून दावा केला होता की, युक्रेनच्या खारकीव्हमधून बाहेर पडणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मोठ्या गटाला युक्रेनच्या सैनिकांनी ओलिस ठेवले असल्याचा दावा रशियाने केला होता. त्यामुळे देशात खळबळ उडाली होती.

रशियाने ट्वीट केल्यानंतर देशभरातून मोदी सरकारवर टीका केली जात होती. मात्र परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी रशियाने केलेला दावा फेटाळला असून युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलिस ठेवल्याचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Tags:    

Similar News