अर्णब गोस्वामी झाला माफीवीर: `ऑफकॉम`ची जाहीर माफी मागितली
भारतात वादग्रस्त पत्रकारिता करून कायदेशीर कचाट्यातून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात संरक्षण लाभलेल्या रिपब्लिक टिव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीला चांद्रयान मोहिमेदरम्यान पाकिस्तानची बदनामी प्रकरणी वीस लाखापर्यंत दंड युके ब्रॉडकास्ट रेगुलेटर ठोठावल्याचं प्रकरण महाग ठरलं आहे. अखेर अर्नब गोस्वामी आणि रिपब्लिक वाहीनीनं `ऑफकॉम`ची जाहीर माफी मागून २८० वेळा चॅनेलवर माफी मागितली आहेत
रिपब्लिक टीव्हीची हिंदी वृत्तवाहिनी असलेल्या रिपब्लिक भारतला युनायटेड किंगडमच्या कम्युनिकेशन्स नियामक कार्यालयाने "आक्षेपार्ह भाषा", "द्वेषयुक्त भाषण" आणि "अपमानास्पद मजकूर" प्रसारण केल्याबद्दल 20,000 पौंड (अंदाजे 19.73 लाख रुपये) दंड ठोठावला होता. व्यक्ती, गट, धर्म किंवा समुदायांचा अपमानजनक वागणूक केल्याबद्दल रिपब्लिक भारत यांना चॅनेलवर माफी मागण्यास सांगितले होते. या प्रकरण आंतराष्ट्रीय पातळीवर पोचल्यानं रिपब्लिकची मोठी बदनामी झाली होती.
6 सप्टेंबर, 2019 रोजी प्रसारित करण्यात आलेल्या वाहिनीच्या "पूछता है भारत" कार्यक्रमात वृत्तनिवेदक रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्नब गोस्वामीनं प्रसारणाच्या नियमांचे उल्लंघन केले. रिपब्लिक इंडियाला यूकेमध्ये प्रसारित करण्याचा परवाना असणार्या वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क लिमिटेडवरही ऑफकॉमनं निर्बंध लादले आहेत.
रिपब्लिक इंडियाला ज्या कार्यक्रमासाठी दंड ठोठावण्यात आला आहे. तो चंद्राच्या चंद्रयान 2 अंतराळ यानाशी संबंधित होता आणि त्यात "पाकिस्तानच्या तुलनेत भारताच्या अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानात प्रगती करत असताना पाकिस्तान दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असल्याची तुलना करण्यात आली होती.
याच कार्यक्रमात गोस्वामी यांनी पाकिस्तानी जनतेचा उल्लेख करत पाकिस्तानी वैज्ञानिक, डॉक्टर, त्यांचे नेते, राजकारणी सर्वच दहशतवादी आहेत. त्यांचे खेळाडू आणि प्रत्येक मुल तिथे दहशतवादी आहे असून कार्यक्रमात सहभागी झालेले पाहुणे देखील दहशत वादी गटांशी संबंधित आहात आरोप केला होता . आम्ही वैज्ञानिक बनवतो तर तुम्ही अतिरेकी बनवता, अशी आक्रस्ताळी टीका गोस्वामीने या कार्यक्रमात केली होती.
ओफकॉम यांनी "जनरल सिन्हा" म्हणून ओळखल्या जाणार्या पाहुण्यांपैकी एकाने केलेल्या टिप्पण्यांचा उल्लेखही केला ज्यांनी पाकिस्तानमधील लोकांना "भिकारी" म्हणून संबोधून देशावर सैनिकी हल्ल्याची धमकी दिली.
ऑफकॉमने नमूद केले की "टिप्पण्या म्हणजे केवळ पाकिस्तानी नागरिकांच्या असहिष्णुतेवर आधारित द्वेषाची अभिव्यक्ती आणि खोटा राष्ट्रवाद आणि दर्शकांमध्ये पाकिस्तानी लोकांबद्दल असहिष्णुता वाढवण्याचा उद्देश दिसतो.
"पाकी" या शब्दाच्या वापराची देखील दखल घेतली. हा शब्द वर्णद्वेद्विरोधी शब्द होता आणि यूकेच्या प्रेक्षकांना स्वीकारता येणार नाही अशा पद्धतीने होता अशा शब्दात ओफकॉमने रिपब्लीक वाहीनीचे वहिनीचे वाभाडे काढले होते.
दंड आणि कारवाई ऑफकॉनकडून सुरु झाल्यानं धाबे दणालेल्या रिपब्लिकनं माफी मागून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. रिपब्लिक वाहीनीनं २६ फेब्रवारी २०२० ते ९ एप्रिल २०२० दरम्यान २८० वेळा माफी मागितली आहे. हे आंतराष्ट्रीय प्रकरण अंगाशी आल्यानंतर माफी मागणारे रिपब्लिक वाहीनी भारतातील द्वेषपूर्ण वृत्ताकंनाबद्दल कधी माफी मागणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहीला आहे.