Covidvaccine : ब्रिटनमध्ये 12 ते 15 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लसीला मान्यता
एकीकडे भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुलांसाठीची कोरोनावरील लस कधी येणार याची प्रतिक्षा असताना आता लहान मुलांसाठीच्या कोरोना लसीला ब्रिटनमध्ये मान्यता मिळाली आहे. ब्रिटनमध्ये 12 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी लसीला मान्यता देण्यात आली आहे. अशाच प्रकारची मंजुरी अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्येही आधीच देण्यात आली आहे.
ब्रिटनने १२ ते १५ वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी Pfizer-BioNTech ने बनवलेल्या लसीच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. Pfizer-BioNTech ची लस १२ ते १५ वर्षांच्या मुलांसाठी सुरक्षित आहे असे ब्रिटनच्या औषध नियंत्रकांनी स्पष्ट केले आहे. भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट अधिक गंभीर असू शकते, अशा इशारा अनेक तज्ज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतात लहान मुलांसाठीची लस कधी येणार याचीच प्रतिक्षा आता सगळ्यांना आहे. Pfizer-BioNTechची लस 16 वर्षे ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सगळ्यांना देण्यास याआधीच मान्यता देण्यात आली आहे.
जगभऱातील अनेक देशांमध्ये लहान मुलांना लस देण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये इटलीने 12 ते 15 वर्षांवरील मुलं, जर्मनी 12 ते 16 वर्ष, फ्रान्समध्ये 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीपासूनच लस देण्यात येत आहे. त्याचबरोबर अमेरिका, कॅनडा, स्वित्झर्लंड या देशांमध्ये मे महिन्याच्या मध्यापासून आणि जूनमध्ये लहान मुलांचे लसीकरण सुरू होणार असल्याचे वृत्त इंडियान एक्स्प्रेसने दिले हे.