मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. मात्र मी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झालो. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा होता. त्यासंदर्भात मी अमित शहा यांच्याशी बोललो होतो. याबरोबरच सध्या विरोधी आघाडीची जी बैठक झाली. ती देशप्रेमींची बैठक होती. कारण ज्याप्रमाणे जनता पक्षाने आणीबाणीनंतर उभारी घेतली. त्याप्रमाणे आता देशप्रेमी पक्ष एकत्र येत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच विरोधी पक्षांची आघाडी झाली आहे. यामध्ये मी पंतप्रधान झालो तरी काय फरक पडणार आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली