“मी कलंक म्हटलं, त्यात एवढं लागण्यासारख काय? - उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल
राज्यातील जनतेकडे सरकार लक्ष देत नाही. सरकार आपल्या दारी हे फक्त नावापूरतंच. जनतेच्या घरात काही आहे का? याकडे सरकारचं लक्ष नसल्याची टीका शिंदे भाजप सरकारवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली;
राज्यातील जनतेकडे सरकार लक्ष देत नाही. सरकार आपल्या दारी हे फक्त नावापूरतंच. जनतेच्या घरात काही आहे का? याकडे सरकारचं लक्ष नसल्याची टीका शिंदे भाजप सरकारवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली
सध्या महाराष्ट्रात भाजपाकडून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आंदोलन सुरु आहे. उद्धव ठाकरे काल एका सभेत देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटलं होतं. त्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारण तापल आहे. उध्दव ठाकरे म्हणाले की “मी कलंक म्हटलं, त्यात एवढं लागण्यासारख काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. तुम्ही एखाद्या माणसला भ्रष्ट म्हणता, त्यावेळी कलंक लावत नाही का? तुम्ही भ्ष्टाचाराचे आरोप करुन एखाद्याला कलंकित करता. नंतर त्याला मंत्रिमंडळात स्थान देता, मग त्याने समाजात वावरायच कसं? माझा कलंक शब्द इतका परिणामकारक ठरेल असं वाटलं नव्हतं” अशी खोचक टीका उध्दव ठाकरे यांनी सरकारवर केली.
दरम्यान यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक पुस्कारावर प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी वर्तमानपत्रात वाचलं येत्या चार-पाच दिवसात लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देण्यात येणार आहे. तो कोणाच्या हस्ते देण्यात येणार आहे? शरद पवार. मग सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं काय झालं. मला तारतम्य कळत नाहीये. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हा लोकमान्यांचा प्रश्न कोणाला विचारायचा. कोण कोणाला विचारणार आणि याचं उत्तर कोण देणार.
७० हजार कोंटींच्या घोटाळ्याचा आरोप केला तो पक्ष आता तुमच्या बरोबर आला. शरद पवार तुमच्यासोबत व्यासपीठावर असणार. आमच्यातले मिंधे तुमच्यासोबत आहेत. मग शेवटी लोकांनी बघायचं काय? जे आरोप केले असतील त्याला जागा. आरोप करताना जबाबदारीनं वागा, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुनावलं.