गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे भोसले यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीबाबत जोरदार चर्चा सुरू असताना अखेर आज पुण्यात दोनही नेत्यांची भेट झाली. 16 जूनपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार संभाजीराजे आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
या भेटी दरम्यान दोनही नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी एकमेकांना सहकार्य करु असं माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच यावेळी खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.
राज्याने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावं नंतर मी केंद्राचं पाहतो. अधिवेशन बोलवून गायकवाड कमिशनच्या रिपोर्टवर चर्चा करावी. आता जस्टीस भोसले यांचा रिपोर्ट आला आहे. थप्पी गोळा करुन काय रद्दीत विकून त्यावर राज्य चालवणार का? काय फालतुगिरी सुरु आहे. असा थेट सवाल राज्यसरकारला करत उदयनराजे यांनी आधी अधिवेशन घेऊ द्या, मग रुपरेषा ठरवतो. मग एकेकाला कसं गाठायचं ते मी बघतो' असं इशारा देत विशेष अधिवेशन बोलवा ना तुम्ही…लाईव्ह प्रक्षेपण करा. पण हे सभागृहात गेल्यावर एक बोलतात आणि बाहेर आल्यावर दुसरं बोलतात. अशी टीका उदयनराजे यांनी केली आहे.
पाहा काय म्हणाले उदयनराजे भोसले...