उदय सामंत यांच्या सुरक्षेत हेळसांड; आमदार बालाजी कल्याणकर पोलिसांवर बरसले

राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक झाल्याची आज समोर आली.;

Update: 2024-04-11 06:31 GMT

आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नांदेड व हिंगोली दौऱ्यावर असताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे नांदेड विमानतळावर शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी, आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख गंगाधरराव बडूरे, जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंडारकर, शिवसेना व महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक झाल्याची आज समोर आली. उद्योगमंत्री उदय सामंत आज लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी नांदेड-हिंगोली जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. उदय सामंत यांना वाय(Y+ Security) दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आलेली आहे. मात्र, आज सुरक्षा व्यवस्थेवरील ताणाचं कारण देत त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली नाही. या प्रकारामुळे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पोलिस अधिक्षकांना चांगलेच धारेवर धरलं आणि जाब विचारला.

उद्योगमंत्री उदय सामंत हे शिवसेना शिंदे गटाचे स्टार प्रचारक आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित दौऱ्यामुळे उदय सामंत यांना सुरक्षा पुरवण्यात आली नसल्याचे पोलीसप्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Tags:    

Similar News